AISHE : C-18743NAAC TRACK : MHCOGN21330UGC 2F & 12BNAAC B+NIRF 2017 Rank

Menu

College Logo

YADAORAO POSHATTIWAR ARTS COLLEGE

अभ्यासक्रम व प्रवेश माहिती

(Course Structure, Admission Process & Eligibility)

अभ्यासक्रम व विषय

प्रथम वर्ष कला शाखा

आवश्यक विषय:

१. इंग्रजी    २. मराठी

ऐच्छिक विषय — खालील पैकी कोणतेही तीन:

  • • अर्थशास्त्र / गृहशास्त्र
  • • राजशास्त्र / समाजशास्त्र
  • • इंग्रजी वाड़मय / मराठी वाड़मय
  • • इतिहास

पर्यावरणशास्त्र:

रा.तु.म. विद्यापीठाच्या अध्यादेशानुसार सत्र २००७–०८ पासून बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात पर्यावरणशास्त्र हा नवीन विषय अनिवार्य आहे.

कालावधी ६ महिने असून विद्यापीठाकडून प्रमाणपत्र दिले जाते. प्रमाणपत्राशिवाय पदवी मिळणार नाही.

प्रवेश पद्धती

प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रवेश आवेदनपत्र स्वतःच्या हस्ताक्षरात सुवाच्च, अचूक व संपूर्ण स्वरूपात भरावे.

आवश्यक कागदपत्रे:

  • शाळा/महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र (LC)
  • मूळ गुणपत्रिका
  • चारित्र्य प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • HSC खाजगी परीक्षेसाठी अस्थायी प्रमाणपत्र
  • इतर बोर्ड/विद्यापीठाचे स्थलांतर प्रमाणपत्र
  • पात्रता प्रमाणपत्र

महाविद्यालयात प्रवेश पात्रता

  • प्रवेश देणे किंवा न देणे याचा पूर्ण अधिकार प्राचार्यांकडे आहे.
  • विद्यार्थी संख्या पूर्ण झाल्यास प्रवेश पूर्वीच बंद होऊ शकतो.
  • विद्यापीठ नियमानुसार अपात्र विद्यार्थ्यांचे शुल्क परत केले जाणार नाही.
  • ७५% उपस्थिती अनिवार्य आहे. अन्यथा परीक्षा देता येणार नाही.

नामांकन पत्र

बी.ए. प्रथम वर्षासाठी नामांकन अर्ज ३१ जुलै पर्यंत भरावा.

उशिरा अर्ज भरल्यास विद्यापीठ नियमानुसार विलंब शुल्क लागू होईल.

सवलती व शिष्यवृत्ती

  • वार्षिक उत्पन्न १५,०००₹ पेक्षा कमी असल्यास शिक्षण शुल्क माफ.
  • SC, ST, OBC, NT, VJNT, स्वातंत्र्य सैनिकांची मुले — शासन शिष्यवृत्ती पात्र.
  • अंध, अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती उपलब्ध.